Pachora News | नगरदेवळा-बाळद गटातुन रावसाहेब जिभाऊ पाटील हेच उमेदवार-आमदार किशोर आप्पासाहेब पाटील.
झूम मराठी ऑनलाईन
नगरदेवळा-बाळद गटाचे जळगाव जि.प.चे माजी सदस्य रावसाहेब जिभाऊ पाटील यांचा काल वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाचोरा-भडगांव चे आमदार आप्पासाहेब कीशोर पाटील यांनी जळगाव जि.प.च्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत नगरदेवळा-बाळद गटातुन रावसाहेब जिभाऊ पाटील हेच शिवसेना पक्षाकडून उमेदवार असतील, त्यांच्या पाठीमागे नगरदेवळा-बाळद गटातील जनतेने खंबीर पणे ऊभे रहावे असे अवाहन आमदार किशोर आप्पासाहेब पाटील यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निपाणे यागावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार आप्पासाहेब पाटील यांनी वरील अवाहन केले. रावसाहेब पाटील हे गटातच नाही तर पाचोरा-भडगांव या दोन्ही तालुक्यात तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहचतात, प्रत्येकांच्या सुख दु:खात ते हजर असतात, आजची उपस्थिती हे त्याचेच उदाहरण असल्याचे आ.पाटील यांनी सांगीतले.
सत्काराला उत्तर देतांना रावसाहेब पाटील यांनी सांगीतले की मी पक्ष आणि जात पात न पाहता माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करित असतो. कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, मार्केट कमेटीचे सभापती गणेश पाटील विकास पाटील, संजय पाटील, राजेंद्र महादेव, संजय भाऊ गोहिल यांच्यासह पाचोरा-भडगांव तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




