ब्रेकिंग

हुंड्याने घेतला भाग्यश्रीचा बळी, पोलीस स्टेशन बाहेर नातेवाईकयांचे ठिय्या आंदोलन अन, मृतदेह अंत्यविधी साठी रवाना..

लोहारा पासून काही अंतरावर असलेल्या जंगीपुरा येथील सासुरवाशीण भाग्यश्री राहुल राजपूत (२७) हिला सासरच्यांनी 20 लाखाच्या हुंडयासाठी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मारहाण केली तसेच गळफास लावून मारून टाकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी पतीसह सासू सासरे व दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मृत भाग्यश्री राजपूतच्या घटनेची सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद पहूर पोलिसात करण्यात आली होती, यानंतर माहेरच्यांनी सासरच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह पोलिस स्टेशनसमोरच गाडीत ठेवत ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी तातडीने मृत भाग्यश्रीच्या पती सह सासरे, सासू व दीर यांना ताब्यात घेऊन चौधांविरुद्ध हुंडाबळी, शारीरिक व मानसिक छळ, मारहाण अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला व अटक केली.

  • भाग्यश्रीच्या माहेरच्या नातेवाईक यांचा आरोप.

मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पती, सासू सासरे व दौर यांनी मारहाण करून गळफास लावून मारून टाकल्याची माहिती राजेंद्र भालचंद्र परदेशी (जंगीपुरा) यांनी विवाहितेच्या वडिलांना कळविली. घटनास्थळी माहेरचे नातेवाइक दाखल झाल्यावर त्यांनी सासरच्या लोकांना विचारणा केली. पण सासरच्यांनी उत्तर दिले नाही. भयत भाग्यश्री हिच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसून आल्याने काही तरी वेगळे आहे ही हत्याच असल्याचा आरोप करत फिर्याद नोंदवली.

भाग्यश्री राजपूत हिचा विवाह जंगीपुरा येथील राहून गोविंदसिंग राजपूत याच्याशी २०२० मध्ये झाला. लग्नात हुंडा कमी दिल्याने माहेरच्यांकडून २० लाख घेऊन ये, असे सांगत पती तिला मारहाण कनीत होला, वारंवार होणान्या त्रासाला भाग्यश्री कंटाळली होती.

या त्रास मुळे माहेरच्या मंडळीनीं ५ लाख रोख दिले होते तरी पतीसह सासरे गोविंदसिंग राजपूत, सासू रेखाबाई गोविंदसिंग राजपूत व दीर सुनील गोविंदसिंग राजपूत हे शारीरिक व मानसिक छळ करीत होते. पतीने दोन लाखात डंपर गहाण ठेवल्याने मोडविण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी मारहाण केल्याचे वडील सरदार बाबुलाल परदेशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पतीसह सासू सासरे व दीर यांना अटक करण्यात आली आहे, पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे