ब्रेकिंग

Pachora | प्रभावती केशव सोनार कालवश

पाचोरा Today | पत्रकार तथा समाजसेवक बंडू सोनार यांच्या मातोश्री प्रभावती सोनार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या, पाचोरा शहरात चिंतामणी कॉलनी राहत्या घरी गुरुवारी (ता. 9 ऑक्टोबर) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात जितेंद्र केशव सोनार, बंडू केशव सोनार हे दोन भावंड आहेत.

आज संध्याकाळी  पाच वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील स्मशानभूमीमध्ये  यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

प्रभावती केशव सोनार नेहमी हसत खेळत स्वभावाच्या होत्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायवर उभे केले, त्याच दोन मुलांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात स्वामी लॉन्स मध्ये 16 तारखेला प्रभावती सोनार यांचा 80 वा वाढदिवस  निमित्त सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करून गूळतुला करण्यात आली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे