भूषण श्रीखंडे जळगाव
जळगाव ः जळगाव तालुक्यातील कानळदा येथील लसीकरण केंद्रातून दोन पारिचारिकांनी कोरांना लसीचीं चोरी करून त्या लसी त्यांच्या नातेवाइकांना एका गाडीत देत असताना नागरिकांना त्यांना रंगहात पकडले. ही घटना आज दूपारी घडली. याप्रकाराचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यावरून आरोग्य विभागाचे धिंडवडे बाहेर आले आहेत.
जिल्ह्यात नागरिकांना लस मिळत नाही. तासनतास रांगेत उभे राहावे लागते. आज दूपारीच्या वेळी दोन पारिचारिकांनी लसीची चोरी करून ओळखपत्र घालून त्या केंद्राबाहेरील रस्त्यावर आल्या. त्यांनी एका चारचाकी गाडीतील नागरिक, महिलांना लसी टोचून दिल्या. बाबत नागरिकांना माहिती होताच त्यांनी गाडी अडवीत लसीकरण बाहेर कसे झाले याचा जाब विचारला. पारिचारीकांनाही उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली.
याप्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.यावरून आरोग्य विभागाचे धिंडवडे बाहेर आले आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा