ब्रेकिंग

धुळे शहरातील दहावीचा विद्यार्थी जयकुमार अखेर सापडला!पश्चिम देवपूर पोलिसांच्या अथक परिश्रमांना यश…

जयकुमार शाळेत जात असताना अचानक गायब झाला होता.

धुळे (देवपूर) येथील चावरा शाळेचा दहावीचा विद्यार्थी जयकुमार उर्फ साई उज्ज्वल जाधव (वय १५) हा १० सप्टेंबर रोजी शाळेला जाताना बेपत्ता झाला होता. सहा दिवस शोध घेतल्यानंतर अखेर पश्चिम देवपूर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून जयकुमारला मध्यप्रदेशातील पिथमपूर येथे सुखरूप सापडला आहे.

जयकुमार शाळेत जात असताना अचानक गायब झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी महामार्गावरील मंदिरे, ढाबे, हॉटेल्स तसेच ५० ते १०० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सोशल मीडियावरही त्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती.

जयकुमार सायकलवरून धुळे सोडून थेट उज्जैनच्या दिशेने गेला होता. महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तो पुढे पायी निघाला. मोबाईल नसल्याने संपर्क होत नव्हता. शेवटी पिथमपूर येथे एका ट्रक चालकाच्या मदतीने त्याने मामाशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून जयकुमारला ताब्यात घेतले व सुखरूप घरी आणले. या संपूर्ण मोहिमेत पश्चिम देवपूर पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता व चिकाटी कौतुकास्पद ठरली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे