आपल खान्देशब्रेकिंग

पाचोऱ्यातील गणेशउत्सवात ‘एक शाम शहीदों के नाम’ या शहीदांना समर्पित कार्यक्रम..


पाचोरा (Pachora) सार्वजनिक गणेशउत्सवात मंडळात ‘एक शाम शहीदों के नाम’ शहीदांना समर्पित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीचीं आरती झाल्यावर भाविकांनी दिवा पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.

पाचोरा पुनगाव परिसरातील राधाकृष्ण माऊली, देवदत्त नगरच्या सार्वजनिक गणेशउत्सवात मंडळाच्या कार्यक्रमात श्री गणेशांची भव्य महाआरती करण्यात आली, नंतर शहीद जवानांना समर्पित देशभक्तीपर संगीतमय गाण्यावर ‘एक शाम शहीदों के नाम’ शहीद जवानांना समर्पित श्रद्धांजली वाहण्यात आली, या कार्यक्रमात उपस्थित नागरिक भावनिक झाले होते. शहीद जवानांबद्दल आदर आणि सैनिकांप्रति कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत होते, परिसरातील लहान बालके, महिलांचा मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.

विशेष असे की या परिसरात अनेक आजी माजी सैनिक वास्तव्यास राहत असूनही काही सैनिकही सुटी वर आले होते ते सैनिक भावनिक झाल्याचे दिसून आले. राधाकृष्ण माऊली नगरच्या सार्वजनिक गणेशउत्सवाचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे