ब्रेकिंग

अवैध धंद्याच्या विरोधात पिपंळगाव पोलीसांची धाडसत्र राबवून कारवाई.. “

पाचोरा तालुक्यातील पिपंळगाव हरे पोलीस हद्दीतील परिसरात अवैध धंदे विरुध्द  सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी मोहीम सुरु केली असल्याने अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक सो. महेश्वर रेड्डी सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर (पवार) चाळीसगांव परिमंडळ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अरुण आव्हाड साहेब यांचे आदेशाने आगामी सन उत्सव अनुषंगाने अवैध धंदे विरुध्द मोहीम राबविण्याबाबत आदेश झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांनी अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम सुरु केली असल्याने अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहे. 

मोहिमेत काल दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ बुधवार रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, पोलीस नाईक राहुल बेहेरे, पोलीस कॉन्स्टेबल यांचे पथक तयार करुन गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार अंबे वडगाव व कोल्हे येथील देशी दारुची चोरटी विक्री करणारे तसेच सट्टा बेटिंग जुगार खेळणाऱ्यांवर धाडसत्र राबवून कायदेविषयक कारवाई केली आहे.

या कारवाईत अंबे वडगाव परिसरातील पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत असलेल्या जोगे फाटा परिसरात अंबे वडगाव येथील अण्णा गोटीराम जाधव, विकास अण्णा जाधव हे स्वताच्या शेतात टपरीवजा दुकानातून देशी दारुची चोरटी विक्री करतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातील ९० एम. एल.‌ मापाच्या सखु संत्र्याची ७१६०/०० रुपये किंमतीची देशी दारु जप्त करत त्यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर २५८/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या कोल्हे गावी सट्टा जुगाराचा खेळ खेळणारे इसमाबाबत माहीती काढुन इसम नामे अजय सतिश शिंदे, सुभाष बाबुराव शेलार, बापु रामदास पाटील, अलम अन्वर तडवी सर्व राहणार कोल्हे तालुका पाचोरा सदर इसम हे सट्टा जुगाराचा खेळ खेळतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यात एकुण ७४७०/०० रोख रुपय व सट्टा जुगाराचा साहीत्य असे मिळुन आले सदर आरोपीवर पिंपळगांव हरे पोलीस स्टेशन ला गु.र.न. २५७/२०२५ महा.जु. का १२अ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे