महाराष्ट्र

प्रत्येक प्रवाशावर 1 रुपया कर आकारला जातो, महिन्याचे 21 कोटी, पडळकरांनी भ्रष्टाचारात थेट ‘मातोश्री’ला ओढलं

एसटीकडून प्रत्येक प्रवाशावर एक रुपया कर आकारला जातो. एसटी प्रवाशाकडून महिन्याला 21 कोटी रुपये वसूल करत असते. हा सर्व पैसा मातोश्रीत जातो, असा गंभीर आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानात शेकडो आंदोलक जमले असून त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. यावेळी पडळकर यांनी एसटीतील भ्रष्टाचारावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. एसटी महामंडळाकडून एक रुपया प्रत्येक प्रवाशावर कर आकारला जातो. एसटीने रोज 65 लाख प्रवासी रोज प्रवास करत असतात. रोज 65 लाख महिन्याचे झाले किती? 21 कोटी… वर्षाचे झाले किती..? पैसे जातात कुठे? हे पैसे मातोश्रीत जातात. एढा हे भ्रष्टाचार करतात. कर्मचाऱ्यांना काहीच देत नाही, असा आरोप पडळकर यांनी केला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे