आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा – श्री गो से हायस्कूलात वय वर्ष 12ते15 गटातील विद्यार्थ्यांचे करोना प्रतीबंधक लसीकरण

झूम मराठी

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आज दिनांक 28 मार्च सोमवार रोजी वय वर्ष 12ते15 गटातील सातवीच्या विद्यार्थ्यांचे करोना प्रतीबंधक लसीकरण करण्यात आले.

 श्री गो. से .हायस्कूल. पाचोरा येथे आज दिनांक28 मार्च रोजी 12ते 18 या वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण देण्यात आले. रोजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित. होते यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील, ए. बी .अहिरे. एन. आर .पाटील. यांच्या उपस्थितीत व आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेविका भारती पाटील ,मनीषा गढरी, आशा सेविका मनिषा अहिरे, वैशाली महाजन यांनी विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसिंग ठेवून लसीकरण करून घेतले यावेळी 175 मुला-मुलींनी लसीकरणाचा लाभ घेतला. इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक शितल महाजन, प्रतिभा पाटील, वैशाली कुमावत, प्रीतम सिंग पाटील, अरुण कुमावत वर्गशिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीने लसीकरण करून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे