आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

जळगावातील करोना बाधित एक वर्षाचे बाळ वाचवन्यात यश!

मृत्यूची झुंज थांबवून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास २३ दिवसांनी बालरोग विभागाला यश आले.

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोग व चिकित्साशास्त्र विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या एक वर्षाच्या बालकाला (child corona) वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विभागाचे कौतुक करून बालकाला रुग्णालयातून सुटी दिली आहे.

जुनोने (ता. बोदवड) येथील एकवर्षीय बालकाला १७ एप्रिलला ताप, सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तो कोरोनाबाधित होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करताना त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती. प्रयोगशाळेतील तपासण्या, एक्स-रे याद्वारे त्याच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी प्रयत्न केले.

तब्बल १२ दिवसांनी प्रकृतीत सुधारणा जाणवून वैद्यकीय पथकाला यश आले. सलग १८ दिवस ऑक्सिजन व त्यानंतर औषधोपचार करून त्याची मृत्यूची झुंज थांबवून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास २३ दिवसांनी बालरोग विभागाला यश आले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरोशे यांच्यासह डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. विश्वा भक्ता, वॉर्ड इन्चार्ज संगीता शिंदे व नर्सिंग स्टाफ यांनी परिश्रम घेतले. आज अधिष्ठाता डॉ. रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांच्या उपस्थितीत बालकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे