आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा शहरातील माजी सैनिकांना कार्यालय उपलब्ध करून देत, अमोल शिंदे यांनी राखला माजी सैनिकांचा सन्मान!

माजी सैनिकांच्या प्रत्येक सुख-दुःखात तत्परतेने उभा राहील अमोल शिंदे यांचे प्रतिपादन


पाचोरा (झूम मराठी) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी पाचोरा तालुक्यातील सर्व माजी सैनिक व त्यांचे परिवारासाठी तसेच शहीद सैनिकांच्या परिवाराला येणाऱ्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी भाजपा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला पाचोरा सेंट्रल मॉल मध्ये एक संपर्क कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सदर कार्यालय वीर जवान माजी सैनिक संस्था पाचोरा या संस्थेच्या माध्यमातून सुरू असणार आहे या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ तसेच शाहिद सैनिकांच्या परिवाराचा सत्कार समारंभ यावेळी जळगाव जिल्हा माजी सैनिक कार्यालयाचे कल्याणकारी अधिकारी अनुरत वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या हस्ते पाचोरा येथील प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे व नगरपरिषद मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की लष्करातील सैनिक व माजी सैनिक हा एक असा घटक असतो की त्याच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. कारण ते सीमेवर लढत असतात व देशाचे संरक्षण करत असतात म्हणूनच आज आपण हे सुरक्षित जीवन जगू शकतो.

तसेच पाचोरा तालुक्यातील माजी सैनिक यांना उपलब्ध करून दिलेले हे कार्यालय हे माझे कर्तव्य समजतो त्यामुळे आपण याबद्दल आभार मानू नका असे त्यांनी माजी सैनिकांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी माझी सैनिक संघ संचालक बाळू पाटील,वीर जवान मा.सैनिक संस्थेचे अध्यक्ष दिपक पाटील,उपाध्यक्ष मधुकर पाटील,मेजर सिताराम पाटील,आदी पदाधिकारी व मा.सैनिक,त्यांचा परिवार तसेच शहीद सैनिकांचा परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे