ब्रेकिंग

जळगाव एसटी डेपो मधील बाभूळगाव मुक्कामाला जाणाऱ्या बसचे मद्यपी चालकामुळे प्रवासी खोळंबले, निलंबनाची कारवाई 


जळगाव एसटी डेपो मधील बाभूळगाव मुक्कामाला जाणाऱ्या बसचे चालक मद्यधुंद असल्याने नागरिकांनी वेळीच बस थांबून चालकाची विभाग नियंत्रणकडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुसऱ्या चालकाची व्यवस्था करून बस मार्गी लावली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव डेपोची बस क्रमांक (एम. एच. 14 बी टी 2304) ही बस बाभूळगाव या गावाला रात्री मुक्कामी जाते. नेहमीप्रमाणे दि. 16 रोजी रात्री बस आपल्या मुक्काम स्थानी निघाली असता पाळधीचा पुल पार केल्यानंतर बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले की बस चालक हा मदयधुंद अवस्थेत आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी एका हॉटेलजवळ बस थांबवली व कंडक्टरला याबाबत सांगितले. याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना मिळताच त्यांनी रात्री खाजगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन पवार यांची चर्चा करून संबंधित मदयधुंद वाहन चालक आनंद माळी याच्या जागी दुसऱ्या वाहन चालकाची व्यवस्था करून गाडी मार्गस्थ केली. 

याबाबत विभाग नियंत्रण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, चालक आनंद माळी याचे मेडिकल केल्यानंतर त्याने मद्यसेवन केल्याचे आढळून आले. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे व यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे