आपल खान्देश

मुक्ताईनगर तालुक्यात मोफत धान्याची परस्पर विक्री, रेशनदुकानदारावर गुन्हा दाखल

झूम मराठी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिखलीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे आठ महिन्याचे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री करणे एका रेशनदुकानदाराला चांगलेच भोवले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील आजाबराव सिताराम पाटील या रेशनदुकानदारावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक आजाबराव सिताराम पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत करण्यात आले होते.

पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी ७० क्विंटल गहू, ३६ क्विंटन तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक ऋषीकेश तानाजी गावडे (वय-२७) यांच्या फिर्यादीवरून रेशनदुकानदार आजाबराव सिताराम पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे