आपल खान्देश
Pachora | जळगाव माजी जि.प सदस्य मधुकर काटे यांना ‘लोकनायक’ पुरस्कार प्रदान…
- झूम मराठी ऑनलाईन
जळगाव लोकमत आणि विजया केसरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘लोकनायक’ पुरस्कार आज जळगाव येथे जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर सुखदेव काटे [पाटील] यांना प्रदान करण्यात आला.
माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर सुखदेव काटे यांना उल्लेखनीय लोकसेवा, जनसेवा आणि कार्यासाठीही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मधुकर सुखदेव पाटील समाजहितासाठी अनेक वर्षे अथकपणे कार्य केले असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेसाठी त्यांचे योगदान अत्यंत लाभदायक ठरले आहे. या पुरस्काराने त्यांच्या निस्वार्थ सेवेचा योग्य सन्मान करण्यात आला असून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतांना दिसत आहे.



