आपल खान्देशकृषीवार्ताब्रेकिंग

पाचोऱ्यातील कृषी सहाय्यक अधिकारीला जळगावच्या एसीबी पथकाने लाच घेतांना पकडले

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा येथील शेतीसाठी लागणाऱ्या पावर ट्रेलर मशीनवर मिळणारी सबसीडी बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच घेणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला जळगावच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पावर ट्रिलर मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मंजूर झाला होता. मशीन खरेदी केली असता सदर योजनेअंतर्गत मिळणारी 85 हजार रुपयांची सबसिडी अर्जदाराच्या खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल देवरे (वय-32) रा. आनंद नगर, प्रतिभा फ्लोअर मिल जवळ, पाचोरा याने दीड हजार रुपयाची मागणी केली होती. याबाबत तक्रार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी 24 मार्च रोजी पथकाने सापळा रचून दीड हजार रुपयाची लाचेची रक्कम स्विकारतांना अधिकाऱ्याला पकडले. या कारवाईमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहॆ.

यांनी केली कारवाई पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन. जाधव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहीरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.क. रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना. जनार्धन चौधरी, पी.ना. सुनिल शिरसाठ, पो.कॉ. प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ. नासिर देशमुख, पो.कॉ. ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे