ब्रेकिंग

नांदगावच्या बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडीच्या वतीने रास्तारोको…


नांदगाव (मुक्ताराम बागुल) नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कांद्यासह कापसाला देखील हा मिळावा अशा इतर मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह पाच आमदारांनी या आंदोलनास सहभाग घेतला होता. सुमारे दोन तासापेक्षा जास्त काळ येवला- नांदगाव मार्गावर हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पाच आमदारांसह इतर महाविकास आघाडीच्य नेत्यांनी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. कांद्याचा भावात घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी सतापलाय. नाशिकच्या नांदगाव मध्ये महाविकास आघाडीने बंद पाडत रास्ता रोको केलाय. पाच माजी आमदारांसह संतप्त कांदा उत्पादक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत कांद्याला निर्यात बंदी उठवावी आणि हमीभाव देण्याची मागणी यावेळी शेतकरी करीत होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे