आपल खान्देशकृषीवार्ता

धुळे जिल्‍ह्यात फळ पीक विमा योजना लागू

@ दिलीप परदेशी

कुसुंबा (धुळे) – पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित मृग बहारमध्ये धुळे जिल्ह्यासाठी डाळींब, मोसंबी आणि लिंबू आदी फळांसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. डाळिंबासाठी शेतकऱ्यांचा हिस्सा सहा हजार पाचशे रुपये, लिंबूसाठी तीन हजार पाचशे रुपये आणि मोसंबीसाठी चार हजार रुपये प्रति हेक्टरी विमा हप्ता भरावा लागेल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.

फळ पिकांचे कमी तापमान, वेगवान वारे, अवेळी पाऊस आदी प्रतिकूल हवामान घटकांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून निघावे म्हणून राज्यात हवामानावर आधारित २०२१ – २२ साठी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजना डाळिंब, मोसंबी व लिंबूसाठी लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील.

उत्‍पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणजास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी चार हेक्टर क्षेत्र मर्यादेत विमा नोंदणीची मुभा आहे. एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारपैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण कवच लागू राहील. योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहनडाळिंबासाठी १४ जुलै, लिंबू व मोसंबीसाठी ३० जून ही मृगबहारासाठी अंतिम तारीख आहे. धुळे जिल्ह्याकरिता डाळिंब, मोसंबी व लिंबू या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाईची रक्कम शासनाने विहित केलेल्या अटींच्या अधीन असेल. धुळे जिल्ह्यातील अधिसूचित महसूल मंडळातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळ‍ पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे