आपल खान्देशआरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंग

Jalgaon | निपाणे  येथील शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी एसीबीने अटक…

 

जळगाव जिल्ह्याती एरंडोल तालुक्याच्या निपाणे येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच प्रकरणी एसीबीने अटक केली. संदिप प्रभाकर महाजन (वय 45) असं अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव असून विशेष म्हणजे तक्रारदाराकडून यापूर्वीही लाच स्वीकारल्याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल होता. आता या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे निपाणे (ता. एरंडोल) येथील संत हरिहर महाराज माध्यमिक शाळेत शिपाई असून संदीप महाजन हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत.

सविस्तर वृत्त असे तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे 23815/-रुपयाचे मेडिकल मंजूर होनेकामी मुख्याध्यापक महाजन यांच्याकडे सादर केले होते. सदर मेडिकल बिल स्वतःचे वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याचे मोबदल्यात मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000/- रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 21/12/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक महाजन यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे 23815/-रुपयांचे मेडिकल बिल मंजूर करून आणून देण्याचे मोबदल्यात तडजोडी अंती सदर मेडिकल बिलाच्या एकूण रकमेच्या 15 % प्रमाणे 3600/-रुपयांची लाचेची मागणी करून सदर ती मिळविण्याचा प्रयत्न केला. म्हणून मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.

दरम्यान मुख्याध्यापक संदिप महाजन यांनी या अगोदर तक्रारदार शिपाई यांचेकडून वेतन निश्चितीच्या फरकाचे 2,53,780/- रु. फरकाचे 5 टक्के प्रमाणे 12500/- रू. ची मागणी करून तक्रारदार याचेकडून 10000/- रु. लाच रक्कम स्विकारली होती. म्हणून मुख्याध्यापक संदिप महाजन यांचे विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन गुरं न 105/2024 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अ प्रमाणे दि.27/06/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे