आपल खान्देश
आखतवाडे ते मोहळाई रस्ता बनवण्यासाठी खा.विकास महात्मे यांना आखतवाडे ग्रामस्थांचे निवेदनाद्वारे साकडे.
आखतवाडे ते मोहळाई रस्ता बनवण्यासाठी खा.विकास महात्मे यांना आखतवाडे ग्रामस्थांचे निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.
चाळीसगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील आखतवाडे ते मोहळाई रस्ता तयार करण्यासाठी आखतवाडे आणि परीसरातील ग्रामस्थांनी धनगर समाजाचे नेते खासदार डॉ. विकासजी महात्मे साहेब यांना साहेब यांना लेखी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

स्थानिक लोक प्रतिनिधीनां वारंवार सांगून हि सदर रस्ता होत नाही तर, आखतवाडे ते मोहळाई रस्ता बनवण्यासाठी खा.विकास महात्मे यांना आखतवाडे ग्रामस्थांचे निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले
खा.डॉ. महात्मे हे दि.२ सप्टेंबर २०२१रोजी एक दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने चाळीसगाव येथे आले असता आखतवाडे, बदरखे आणि मोहळाई येथील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी खा.महात्मे यांची भेट घेतली यावेळी धनगर समाज संघर्ष समिती प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब शिंदे, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी, ऊपाध्यक्ष पुरध्विराज गढरी, आखतवाडे चे मा.सरपंच संजय परदेशी, मोहळाईचे मा.सरपंच राजेंद्र परदेशी, धरम पवार ई.सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.डॉ. महात्मे यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, आखतवाडे ते मोहळाई ह्या ५ ते ६ की.मी. अंतराचा रस्ता संद्य स्थितीत अंत्यंत खराब झालेला आहे, सदर रस्त्याने संध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात पायीसुध्दा चालणे मुश्कील झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेती कामासाठी शेतात जा-करणे अंत्यंत कठीण झाले आहे.
तसेच सदर रस्ता तयार झाल्यास पुढे बदरखे, मोहळाई, आणि निपाणे या तीन गावांना अंत्यंत कमी अंतराने दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
सदर रस्त्याच्या कामासाठी संबंधित विभागाकडे तातडीने पाठपुरावा करून शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.महात्मे यांनी यावेळी समाज बांधवांना सांगितले.





