आपल खान्देश

Nandurbar News | आजी आजोबांना कंडक्टरकडून अपमानास्पद वागणूक !

फुकटचे प्रवासी म्हणत बसमधून खाली उतरवण्यात आले

नंदुरबारच्या शिरपूर आगाराच्या बसमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर आगाराच्या बसमध्ये वृद्ध प्रवाशांसोबत संतापजनक प्रकार घडला आहे. उर्मट बस कंडक्टरने आजी-आजोबांना अपमानास्पद वागणूक देत बसमधून खाली उतरवलंय. बस कंडक्टरचा उर्मटपणा समोर आला असून वृद्ध आजी-आजोबांना कंडक्टरने खाली उतरवल्याचा प्रकार घडलाय. अपमानास्पद वागणूक करत बसमधून आजी-आजोबांना उतरवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फुकट प्रवास करणारे आहेत, अधिकारी राहिले असते तर गोष्ट वेगळी राहिली असती, असं बस कंडक्टर बोलत असल्याचं समोर आलं आहे, बस खराब झाल्याने दुसऱ्या शिरपूर आगाराच्या बसमध्ये वृद्ध आजी आजोबा चढत असताना हा प्रकार घडला असून सदर बस कंडक्टरने केलेल्या या संतापजनक प्रकारानंतर सोशल मीडियावर बस कंडक्टर विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे