आपल खान्देश

राष्ट्रीय जनमंच पक्ष जळगाव तालुका आणि जळगाव शहर कार्यकारिणी नव्याने जाहीर

राष्ट्रीय जन मंच पक्ष हा उत्तर महाराष्ट्रात वेगाने वाढणारा पक्षाची आढावा बैठक शुक्रवारी 16 मे 2025 रोजी शासकीय विश्रामगृह जळगाव येथे  उत्साहात पार पडली.

आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पक्ष संघटन मजबूत करणे तथा येणाऱ्या निवडणुकीसाठी तयार राहण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख देविदास वाघ यांनी मार्गदर्शन केले.

जळगाव जिल्हा अध्यक्ष देविदास हटकर यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढवू. जळगाव जिल्हा संघटक अमृत आबा सैदाने यांनी राष्ट्रीय जन मंच पक्ष हा उत्तर महाराष्ट्रात वेगाने वाढणारा पक्ष आहे. . यावेळी खालील नियुक्त्या करण्यात आल्या.

जळगाव तालुका अध्यक्ष- अंकुश हिरामन बाविस्कर

जळगाव शहराध्यक्ष – प्रमोद रघुनाथ डोंगरे

उत्तर महाराष्ट्रात, येत्या सहा महिन्यांत ५० हजार सभासद नोंदणीचे उद्देश असून ते लवकरच पूर्ण करू असा आत्मविश्वास महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप दादा लांडगे यांनी व्यक्त केला.

यावेळी एरंडोल तालुका अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष शब्बीर पटेल, सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक सपकाळे, विशाल सुधाकर बनसोडे, कल्पेश दिलीप डोंगरें, गोकुळ अण्णासाहेब पाटील पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे