Pachora | शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या डिप्लोमा फार्मसी दुसऱ्या वर्षाचा निरोप समारंभ,
झूम मराठी ऑनलाईन | पाचोरा
पाचोरा तालुक्यातील शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पाचोरा येथे डिप्लोमा इन फार्मसीच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमात शिंदे फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. मनोज पाटील यांनी “Pharmaceutics” या विषयाच्या पुस्तकाचे प्रकाशन करून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरावे, असा उपक्रम राबवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरणाई शिक्षण संस्थेचे संचालक तात्यासाहेब पंडितराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च, जामनेरचे उपप्राचार्य डॉ. सूरज सरोदे, प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. मयूर भुरट, संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी डॉ.शिवाजी शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मुनोत, शिंदे इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य डॉ.विजय पाटील उपस्थित होते.
डॉ शिवाजी शिंदे व नीरज मुनोत यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.जयश्री बोरसे, प्रा. शुभम चव्हाण, प्रा. निकिता बडगुजर, लॅब असिस्टंट समाधान बोरसे तसेच डिप्लोमा व बॅचलर इन फार्मसीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




