आपल खान्देश

पाचोरा शहरातील जलकुंभाला २४ तास गळती; हजारो लीटर पाण्याची नासाडी..

पाचोरा (झूम मराठी) जिल्ह्यात मुबलक जलसाठा असला तरी ही पालिका प्रशासन पाणी जपून वापरा असा उपदेश करत असताना पाचोरा नगर पलिकेच्या पुनंगाव रोड वरील गणेश कॉलनीच्या जलकुंभाला गळतीलागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.  जळकुंभातून 24 तास पाणीगळती सुरू आहे.

पुनंगाव रोड वरील गणेश कॉलनीच्या जलकुंभाच्या टाकीमधील गळतीमुळे पाणी २४ तास वाहत आहे. टाकीच्या पाईपातून पाणी लिकेजची तीव्रता जास्त असल्याने हा सर्व परिसर जलमय होतो. त्यामुळे अनेक वेळा येथील लोकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. तसेच या वाहत्या पाण्यामुळे टाकीकीचे पाणी नाल्यात जात असल्याने नगर पालिका प्रशासनाने त्वरित सदर पाईप दुरुस्त करावा. एक तर आठवड्यातुन एकदाच पाणी येत असत त्यात जर असं पाणी वाया जात असेल तर प्रसासन करते तरी काय??

पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली टाकी जुनी आहे. त्याची अनेक वर्षांपासून डागडुजी केली नसल्याने येथून गळती होते. तसेच सदर जळकुंभाला वरती जाण्यासाठी जिनाच्या जीर्ण झालेल्यापायऱ्याचीं दुरावस्ता झालेली दिसत आहॆ.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे