नाशिक- आई बाबांनी आधी मुलाला संपवलं, नंतर आत्महत्या, घटनेमागील कारण धक्कादायक !
आई-वडिलांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा असणं, यात गैर काहीच नाही. पण त्या अपेक्षांच्या मोहापाई स्वत:ला त्रास करुन घेणं आणि मुलालाही त्रास देणं योग्य नाही. पालक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या असतात
नाशिक : आई-वडिलांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा असणं, यात गैर काहीच नाही. पण त्या अपेक्षांच्या मोहापाई स्वत:ला त्रास करुन घेणं आणि मुलालाही त्रास देणं योग्य नाही. पालक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या असतात. पण काही पालक आपल्या मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवतात. नंतर त्या पूर्ण करण्यासाठी मुलाला त्रास देतात. तसेच स्वत:ही त्रास करुन घेतात. अशीच काहिशी घटना नाशिकमध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. मुलगा अभ्यास करत नाही म्हणून महिलेने संतापात त्याची हत्या केली. नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये उघड झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृत्यूदेह घरात आढळून आला आहे. दरम्यान, मुलाचा खून करुन महिलेने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

महिलेने सुसाईट नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?




