Kusumba | कुसुंबा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने नूतन व्यापारी गाळे व इमारतीचे भूमिपूजन संपन्न..
कुसुंबा | प्रतिनिधी,
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने नूतन व्यापारी गाळे व इमारतीचे भूमिपूजन धुळे जिल्हा सहकार विभागाचे उपनिबंधक मनोज चौधरी, कुसुंबा वि का सोसायटीचे चेअरमन राजेंद्र सूर्यवंशी व व्हाइस चेअरमन श्रीमती पुष्पाबाई पवार यांच्या हस्ते भूमिपूजन मोठया उत्साहात पार पडला.
परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कुसुंबा विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून कुसुंब्यातील व्यापारी बांधवासाठी प्रशस्त नवीन व्यापारीसाठी व्यापारास नवीन दिशा देण्यासाठी गाळे व इमारतीचे भूमीपूजन गुढी पाडवा, मराठी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

सदरभूमिपूजन कार्यक्रमा वेळी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी आपले मत मांडत विविध कार्यकारी सोसायटी ही शेतकऱ्यांसाठी कशी उपयुक्त आहे, सोसायटीच्या माध्यमातून आपण काय काय व्यवसाय चालू करू शकतो याबाबत माहिती दिली, आणि कुसुंबा विकास सोसायटी ही तफावतीमुळे बरखास्त होणार होती, परंतु सर्व संचालक व ग्रामस्थ यांच्या आर्थिक सहकार्याने ती तफावत दूर करण्यास संचालक मंडळाला यश आले, व कुसुंबा विकास सोसायटी बरखास्त होण्यापासून वाचली, धुळे जिल्ह्यात कोणत्याही सोसायटीने अजून पर्यंत पैसे भरलेले नाही कुसुंबा सोसायटी ही एकमेव सोसायटी आहे की ज्यांनी पैसे भरून सोसायटी ची तफावत दूर केली असे बोलतांना सांगितले.

कुसुंबा वि का सोसायटीचे चेअरमन राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य संग्राम आबा पाटील यांनी सोसायटीच्या नवीन इमारत व व्यापारी गाळ्यांची माहिती यावेळी दिली. व्यापारी गाळे व इमारतीचे भूमीपूजनाच्या कार्यक्रम व्यासपीठावर जिरे समाजाचे आराध्य दैवत सगर राजा यांची जयंतीच्या निमित्ताने सगर राजा यांच्या प्रतीमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,
यावेळी सोसायटीचे सर्व संचालक, जिल्हा परिषद सदस्य संग्राम आबा पाटील, पंचायत समिती सदस्य रितेश परदेशी, डॉ लेखराज शिंदे, वास्तूविशारद योगेश सोनार हे उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंकुर संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शार्दुल हे होते, कार्यक्रमाला कुसुंबा गावातील सोसायटीचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पं. स. सदस्य रितेश परदेशी यांनी केले.


