जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम शाळेत बिजेएसच्या वतीने स्मार्टगर्ल कार्यशाळा संपन्न
- झूम मराठी ऑनलाईन न्यूज | दिलीप परदेशी
पाचोरा शहरातील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत भारतीय जैन संघटनेच्या महिला शाखे तर्फे विद्यार्थीनीसाठी दोन दिवसीय ‘स्मार्ट गर्ल कार्यशाळा’ घेतली गेली यात शाळेतील मुलींचां स्वावलंबी कसे व्हावे, आत्मविश्वासा सोबत निर्णय कसा घ्यावा, समाजात वावरतांना कोणत्या गोष्टींचे पालन करावे याचे मार्गदर्शन कारण्यात आले
कार्यशाळेकरिता मार्गदर्शक म्हणून हिंगोली येथील रत्नाकर महाजन हे लाभले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत रत्नाकर महाजन यांनी विद्यार्थीनीनी स्वावलंबी कसे व्हावे, आत्मविश्वासा सोबत निर्णय कसा घ्यावा, समाजात वावरतांना कोणत्या गोष्टींचे पालन करावे,आयुष्यभराची सफलता प्राप्त करून सक्षम कसे व्हावे, स्वातंत्र्य जबाबदारीने स्वीकारणे म्हणजे सक्षम असणे प्रत्येक व्यक्तीला निर्णय घेण्याचे आणि निवडण्याचे स्वातंत्र्य हवे असते,स्व-जागरूकता,संवाद आणि संबंध,मासिक धर्म आणि स्वच्छता व पोषण, आत्मसम्मान व आत्मरक्षा, निवड व निर्णय, मैत्री आणि प्रलोभन, आई-वडिल यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद कसा साधावा या बाबत श्री रत्नाकर महाजन सरांनी सखोल असे परिपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थीनीना केले.
यावेळी भारतीय जैन महिला संघटनेच्या अध्यक्षा हर्षा संघवी,जळगाव जिल्हा सचिव तृप्ती संचेती,मित्तल शहा, खुशी बांठिया, प्रियंका संघवी, प्रितिभा बाफना,कृतिका ओसवाल, हर्षाली छाजेड, लता बांठिया, सोनी जैन, या महिला संघटनेच्या सर्व सदस्या व पदाधिकाऱ्यांनी परिपूर्ण परिश्रम घेतले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी, सचिव जीवनजी जैन, सहसचिव संजयजी बडोला, खजिनदार जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवाणी, संचालक संजयजी चोरडीया, गुलाबजी राठोड श्री.प्रभुलालजी शर्मा,श्री.गोपालजी पटवारी,सौ.प्रितीजी जैन. श्री.महेंद्रकुमारजी हिरण, श्री.अशोककुमारजी मोर, श्री.शेखरकुमारजी धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, शितल तिवारी, दिपिका रणदिवे, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर,कविता जोशी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, पिंकी जैन, राधा शर्मा, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे,संगिता पाटकरी, पुजा अहिरे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, कल्पना बोरसे, निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदिप परदेशी, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी,मनिषा पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती संचेती व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मित्तल शहा यांनी केले, व संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.



