आपल खान्देश

थरारक: जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर अज्ञातांनी झाडल्या गोळ्या

 जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना समोर आली.या घटनेनं संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून रात्री उशिरा जळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने या हल्ल्यामध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांना कोणतीही इजा झालेली नाही अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.

काल दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान शहरात दोन गटांमध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादावरून भांडण झाले होते याबाबतची गुन्हा नोंदण्याचे काम रामानंद पोलीस स्टेशनला सुरू होते, हे प्रकरण मिटविण्यासाठी उपमहापौर त्याठिकाणी आले असता यावरून त्यातील एका गटाची उपमहापौरांवर नारागजी असल्याने त्यातून हा गुन्हा झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाल्याचं पोलीस अधीक्षक मुंडे यांनी सांगितले आहे.

दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहे. मात्र या गोळीबाराच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे