ब्रेकिंग

चोपडा हेलिकॉप्‍टर कोसळले

जळगाव : जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा तालुक्याती वर्डी शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटना झाली. यात एक जणांचा मृत्‍यू झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी आहे.

https://youtube.com/shorts/XNqis3L5cRg?feature=share

चोपडा तालुक्‍यातील वर्डी शिवार असलेला भाव हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्‍या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी चारच्‍या सुमारास झाली आहे.

दुर्घटना झालेले हेलिकॉप्‍टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप स्‍पष्‍ट झालेली नाही. मात्र हेलिकॉप्‍टर असल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात एक जणांचा मृत्‍यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी आहे. आदिवासी परिसर असल्‍याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्‍टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्‍यात नेले. चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्‍थळी पोहचत आहेत.

दाट जंगल परिसर सदर घटना घडली हा परिसर सातपुडा पर्वत रांगेत असून, घनदाट जंगलाचा परिसर आहे. घटनास्‍थळी पोहचण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावे लागत असल्‍याने प्रशासनाची देखील तात्‍काळ मदत मिळणे कठीण आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे