जागृती विद्यालयातील माजी विद्यार्थीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप करून साजरा केला वाढदिवस.
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा शहरातील जागृती विद्यालयातील माजी विद्यार्थी आकाश आनंद नन्नवरे या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला.आज-काल वाढदिवसानिमित्ताने युवक हे हजारो रूपाची उधळपट्टी करत आपला वाढदिवस साजरी करत असतात. परंतु या युवकांनी आपल्या इष्ट मित्रांना कुठल्याही पद्धतीचा केक फुलहार इत्यादी वस्तू न आणता गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना मला पेन, वही,शालेय उपयोगी वस्तू वाटप करायचे आहेत.तरी माझ्या वाढदिवसाला जर आपणास शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण मला शालेय वस्तू भेट देऊन माझा वाढदिवस साजरी करावा. अशी सर्व मित्रांना त्याने विनंती केली.
त्याच्या विनंतीला देखील मित्रांनी साथ व मदत करत या नवीन सामाजिक प्रथेला सुरुवात केली. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते किशोर डोंगरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड अमोल मस्के, अजय शिरसाठ व पूजा भोई हे असून अनमोल सहकार्य शुभम खरे, राहुल अहिरे, विक्की जगताप, सचिन देहडे, दीपक सोनवणे, भीमा लहासे, गणेश पाटील, आकाश अहिरे, डिगंबर भिसे, विक्की शिरसाट ईष्टमित्र असून कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जागृती विद्यालयाचे मुख्यध्यापक आर.जी सावंत सर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी.आर.पाटील सर यांनी केले असून मार्गदर्शक हे माजी मुख्याध्यापक आर.एस.वाणी सर हे होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आकाश नन्नवरे यांनी आपल्या जागृती विद्यालयातील बालपणातील किस्से सांगत मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे अॅड.अमोल मस्के व सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत आकाश नन्नवरे याचे कैतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जागृती महाविद्यालयाचे मुख्यध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित त्यांचे आभार देखील मानले.



