Shiv Jayanti: चक्क मोहरीवर साकारले महाराज! नाशिकच्या तरुणीची अशीही शिवभक्ती…!
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वात छोटे चित्र बनवून नाशिक मधील ऐश्वर्या औसरकर या महिला कलाकाराने जागतिक विक्रमात आपले नाव नोंदवले आहे. अथक परिश्रमानंतर या कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असे 1.40 mm.चे रंगीत चित्र तयार केले आहे, जे पाहण्यासाठी भिंगाची गरज भासेल.
खंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे असंख्य यांचे मावळे हे महाराजांची कलाकृती मोठ्यात मोठ्या वस्तूंवरती साकारून महाराजांना मानवंदना देत असतात, परंतु नाशिक मधील ऐश्वर्या औसरकर नामक ध्येयवेड्या तरूणीने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचे रंगीत चित्र दैनंदीन आहारातील फोडणी साठी वापरण्यात येणाऱ्या व डोळ्यांनाही दिसणार नाही अशा एका बारीक राई वर – जिचे मोजमाप हे अवघे 1.40 mm असून त्या वरती कुठ्ल्याही प्रकारच्या भिंगाचा वापर न करता रंगीत चित्र काढून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला आहे, तसेच असेच काहीस म्हणाव लागणार आहे,
महत्वाची बाब म्हणजे औसरकर यांच्या अंगी असलेल्या सूक्ष्म कलेची दखल आपल्या देशातील नामांकित संस्था इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली असून त्यांना कुठल्याही प्रकारची भिंगाचा वापर न करता सूक्ष्म चित्र काढणारी – पहिली महिला सूक्ष्म चित्रकार म्हणून अधिकृत घोषणा संस्थेच्या अधीकृत संकेत स्थळावर करण्यात आलेली आहे, त्या संदर्भातील प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व मेडल त्यांना दि ०८.०८.२०२४ गुरुवार रोजी मिळाले आहे, त्यामुळे हा सर्व नाशिककरांसाठी सुखद धक्काच म्हणावा लागणार असून देशातील व बाहेरील देशातील अनेक सूक्ष्म चित्रकार हे चित्र काढत असताना विविध प्रकारच्या भिंगांचा वापर करत चित्र काढत असतात परंतु नाशिक मधल्या सूक्ष्म चित्रकार औसरकर यांनी कुठल्याही प्रकारचा भिंगाचा वापर न करता चक्क 1.40 मी मी इतक्या सूक्ष्म राई वरती छत्रपती शिवरायांचे रंगीत चित्र साकारत आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे, त्या मुळे सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
लंडनमधील प्रसिद्ध नामांकित संस्था वर्ल्ड वार्ड बुक ऑफ रेकॉर्ड ह्या संस्थेने देखील त्यांच्या ह्या कलेची दखल घेतली असून, भारतातील एकमेव व कुठ्ल्याही प्रकारचा भिंगाचा वापर न करता चित्र काढणारी पहिली महिला सूक्ष्म चित्रकार म्हणून औसरकर यांच्या कलेची नोंद घेतली असून संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ वरती लवकरच नाव घोषित करणार असल्याचे औसरकर यांना मेल द्वारे कळविले आहे.




