जि.प.सदस्य पदमसिंग पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विवीध विकास कामे कुंरगी-बांबरूड गटात मंजुर!
कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी खेचुन आणला विकासकामे लवकरच होणार भुमीपुजनास सुरुवात.
जि.प.सदस्य पदमसिंग पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विवीध विकास कामे कुंरगी-बांबरूड गटात मंजुर! लवकरच होणार भुमीपुजनास सुरुवात.
कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटांमधील असंख्य प्रश्न प्रलंबित होते आणि दुसरीकडे त्या कामांचा सतत शासनदरबारी पाठपुरावा सुरू होते. उशीरा का होईना – मागील काळात कोरोना कमी झाला आणि शासकीय तिजोरी विकास कामांकडे वळली व जिल्हा परिषद गटांमधील विविध मंजुर विकास कामांना निधी मिळण्यासाठी सुरूवात झाली. तब्बल अंदाजित रक्कम ७ कोटी रूपयांचा विकास निधी गटांमधील समस्या मिटवण्यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी खेचुन आणला.
मंजुर विकासकांचे भुमिपुजन सोहळ्याला येत्या रविवार पासुन सुरूवात होणार आहेत आणि निधी प्राप्त झाल्याने लवकरात लवकर या विकास कामांना वेग देऊन पुर्ण प्राप्ती करून देण्याचा मानस जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांचा आहे.
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते या विकास कामांचे भुमिपुजन संपन्न होणार असुन जिल्हाभरातील अनेक मान्यवर सह प्रशासकीय अधिकारी उपस्थित असणार आहे.या खेचुन आणलेल्या विकास कामांच्या निधीमुळे कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटाच्या अनेक प्रमुख समस्यांमध्ये भर पडुन दोन वर्षांत रखडलेल्या कामांचा व प्रकल्पांचा वाया गेलेल्या वेळेचा अवशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांचा असणार आहे. या विकास कामांच्या भुमिपुजन सोहळ्यांना परीसरातील आजी-माजी शिवसेना व युवासेना आणि महिला आघाडीचे प्रमुख महिला पदाधिकारी सह लोकप्रतिनिधी व नागरीक यांनी कोरोना नियमांचे व अटींचे पालन करून मास्क लावुनी उपस्थित राहावे असे. नम्र आवाहन जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी केले आहे.




