आपल खान्देश
पाचोरा तालुक्यात दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोहीम सूरू करण्याची मागणी
तालुक्यात दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोहीम सूरू करण्याची मागणी
आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे लहान-थोर मंडळी दूध पितात. मात्र सध्या राज्यामध्ये दुधात भेसळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना जरब बसण्यासाठी व भेसळ रोखण्यासाठी, तसेच परराज्यात जाणाऱ्या व राज्यातील जनतेला उपलब्ध होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासवि असे निवेदन करण्यात आले आहे.
पाचोरा तालुक्यातील दुध डेअरी मधील दुधाची गुणवत्ता तपासून दुध भेसळ असल्याचे आढळल्यास तात्काळ संबंधित उत्पादक व पुरवठादाराविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कठोर कारवाई असे निवेदन देण्यात आले आहे.



