आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोऱ्याच्या श्री गो से.हायस्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

*गो.से.हायस्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न*

पाचोरा ( प्रतिनिधी)पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कूल या विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त तांत्रिक विभागाचे शालेय समिती चेअरमन वासुदेव महाजन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, शालेय समिती चेअरमन मा.दादासाहेब देशमुख, पनवेल येथील न्यायाधीश कृष्णा सोनवणे, संस्थेचे पदाधिकारी,यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेचे माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक तसेच पालक हे याप्रसंगी उपस्थित होते.

 यावेळी विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड संचलन, डंबेल्स, घुंगरूकाठी, लेझीम, सामूहिक देशभक्तीपर गीते, “कास्टलेस इंडिया” हे बालनाट्य सादर केले.  शाळेतील कला, विज्ञान व क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थांचा मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी गौरव करण्यात आला.

 विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.आर.पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल.पाटील, पर्यवेक्षक ए.बी.अहिरे, सौ.ए.आर. गोहिल, आर.बी.तडवी, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन.पाटील, किमान कौशल्य प्रमुख एम.बी. बाविस्कर, कार्यालय प्रमुख ए.बी.सिनकर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख एम.टी.कौंडिण्य, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर वृंद यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर.बी.बोरसे यांनी तर पर्यवेक्षक ए.बी.अहिरे यांनी संविधान उद्दिष्ट्ये वाचन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे