आयुष्यातील यश जाणण्याचा सर्वोत्तम मार्ग जिद्द व चिकाटी होय-प्रा.सुरेश कोळी
भडगावात तीन दिवशीय पोलिस मोफत प्रशिक्षण शिबिर उद्घाटन
झूम मराठी न्यूज नेटवर्क
भडगांव (झूम मराठी वृत्तसेवा) “आयुष्य बदलण्यासाठी आपला सकारात्मक दृष्टीकोन व त्यासाठी जिद्दीने अभ्यासात झोकून देण्याची तयारी असावी कोणतेही उदिष्ट पूर्ण करण्यासाठी मनन चिंतन आणि लेखन व वाचनाची जोड आवश्यक असते. संधी प्रत्येकाला मिळतं असते त्याचे सोने करण्यासाठी सतत परिश्रमसाठी जिद्दी मेहेनत व प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते.हवा कितीही चांगली असली तरी पतंग पक्षी होऊ शकत नाही तो कागदाचा तुकडा आहे,स्वतःमध्ये असे सामर्थ निर्माण करा की गरज पडल्यास इतरांच्या कामी येणे.मदत करण्यासाठी पैसे पाहिजे असे नाही तर जूनून असायला हवी , योग्य मार्गदर्शन व मार्गदर्शक असेल तर यश हमखास मिळते “असे विचार प्रा सुरेश कोळी यांनी व्यक्त केले ते तीन दिवशीय पोलिस मोफत प्रशिक्षण शिबिर उद्घाटन करताना म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.डी.बी. कोळी होते.
आयुष्यातील यशाकडे नेणाऱ्या सर्वोत्तम मार्गातील सारथी म्हणजे जिद्द व चिकाटी होय- प्रा.सुरेश कोळी
आयुष्य बदलण्यासाठी आपला सकारात्मक दृष्टीकोन व त्यासाठी जिद्दीने अभ्यासात झोकून देण्याची तयारी असावी. कोणतेही उदिष्ट पूर्ण करण्यासाठी मनन, चिंतन, लेखन व वाचनाची जोड आवश्यक असते. संधी प्रत्येकाला मिळतं असते त्याचे सोने करण्यासाठी सतत परिश्रम साठी जिद्दी मेहेनत व प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते.हवा कितीही चांगली असली तरी पतंग पक्षी होऊ शकत नाही तो कागदाचा तुकडा आहे,स्वतःमध्ये असे सामर्थ निर्माण करा की गरज पडल्यास इतरांच्या कामी येणे.मदत करण्यासाठी पैसे पाहिजे असे नाही तर जूनून असायला हवी , योग्य मार्गदर्शन व मार्गदर्शक असेल तर यश हमखास मिळते “असे विचार प्रा सुरेश कोळी यांनी व्यक्त केले.ते तीन दिवशीय पोलिस मोफत प्रशिक्षण शिबिर उद्घाटन करताना म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डी. बी. कोळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पोलीस भरतीची संपुर्ण तयारी व लेखी परीक्षेसाठी विषय घटकांचे गुणभारानुसार विभाजन करून अभ्यास करण्याचे तंत्र समजावून सांगितले.तसेच पहिल्यांदाच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आपला आत्मविश्वास, जिद्द व अचूक प्रयत्न कायम टिकवून ठेवल्यास नक्की मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मेहनती होतकरू उमेदवारांमध्ये विशाल पाटील उमा मालचे, राहुल कुंभार,राहुल पाटील कुणाल शिंपी, धनराज पाटील, ललित पाटील समाधान पाटील, दीपक आमले, जगदीश पाटील, शैलेश पाटील, जिजाबरव अहिरे, अर्चना सोनवणे, दीपाली सूर्यवंशी सुमित्रा परदेशी,भूषण कोळी, सागर पाटील, सचिन मिस्त्री, शुभम महाजन, निशा सोनवणे शीतल परदेशी, योगिता सोनवणे इ.नी शिबिराच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु वैशालीमाळीने केलेे प्रास्ताविक सौ प्रतिभा कोळी यांनी तर आभारप्रदर्शन शुभांगी पाटील हिने केले.



