पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाच्या अध्यक्षपदी संगीता प्रजापत
- दिलीप जय परदेशी
पाचोरा (झूम मराठी वृत्त) पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाची वार्षीक सभा विद्यामंदीर येथे सौ. क्षमा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाच्या अध्यक्ष पदी सौ. संगिता भरतकुमार प्रजापत यांची एकमताने निवड करण्यात आली.
पाचोरा भडगाव ग्राहक सेवासंघाचे सरचिटणीस आनंद नवगिरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेचा वार्षीक अहवाल सादर केला; ग्राहक सेवा संघ या सेवाभावी, स्वयंसेवी, ग्राहक हितासाठी कार्य करणाऱ्या संघटनेने वर्षभरात जे कार्य केले, त्याची माहिती दिली. रेल्वे प्रश्नासंबंधी रेल्वे गाड्यांना मिळणे सबंधी रेल्वे मंत्री व रेल्वे प्रशासन यांना वेळोवेळी निवेदने पाठविली, पाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे. यासगि आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदने पाठ – विली, पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन शासनाने काम- -काज सुरु केले आहे. १५ मार्च – जागतिक ग्राहक हक्क दिन २४ डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक दिन ग्राहक सेवा संघा तर्फे साजरे करण्यात आले.. आर. पी. बागूल यांनी रेल्वे बाबत सविस्तर माहिती दिली. या सभेस संस्थापक- नेते प्राचार्य डी एफ पाटील , व्ही. टी. जोशी, विनोदराय मोदी, डॉ. भरतकुमार प्रजापत, राधेशाम दायमा, डी. बी. पाटील, अशोक महाजन, शेख खलील सर, अनिल येवले, गोपाल पटवारी, ललीता परित, मंजु जोशी, दुर्गा मोरे, संगिता जळतकर, मंगल देवरे, शंकुतला जोशी, शांताबाई गोसावी, बेबाबाई कासार, एकनाथ सदनशीव, कैलास अहिरे, अब्बास कपाशी, शंकर वाघ, जगदिश खिलोशिया, रविंद्र सोनवणे, राकेश सावंत, आदित्य पाटील, अशोक मोरे, प्रथमेश प्रजापत, स्नेहा प्रजापत, जान्हवी प्रजापत, साथी, आदि उपस्थित होते.




