ब्रेकिंग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेज्येष्ठ नेते संजयदादा गरूड यांचे आपल्या कार्यकर्त्यासह केला भाजप प्रवेश..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेज्येष्ठ नेते संजयदादा गरूड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे.

याबाबत अधिक असे की, जामनेर विधानसभा मतदारसंघातील मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजयदादा गरूड हे दोन राजकीय विचारधारांचे दोन विरोधी नेते होते. संजय गरूड यांनी सुरूवातीला काँग्रेस पक्षात नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अलीकडे शरद पवार गटाच्या माध्यमातून मंत्री गिरीशभाऊंना सातत्याने आव्हान देण्याचे काम त्यांनी केले आहे. गिरीष महाजन यांचे वर्चस्व भेदण्यास त्यांना अपयश आले असले तरी तगडी फाईट देण्यासाठी सक्षम असणारे दिग्गज नेते म्हणून संजय गरूड यांची ख्यात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील ते मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या विरोधात उभे राहतील अशी शक्यता होती. परंतू काही दिवसांपुर्वीच ते भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

दरम्यान संजय गरूड हे आपल्या समर्थकांसह मुंबईतील यशवंतराव चव्हाण स्मृती केंद्रातील भव्य कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलल्याचे पहायला मिळाले. आगामी निवडणूकीमध्ये आता संजय गरूड हे मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे चित्र पहायला मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे