आपल खान्देश
पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी शकील शेख, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जळगाव | झूम मराठी ऑनलाईन
पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक (ASI) शकील शेख यांनी 15 वर्षांहून अधिक काळ उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत आज 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी प्रमुख उपस्थित होते.



