आपल खान्देशब्रेकिंग

नाशिक पोलिस दलात खळबळ; पोलिस निरीक्षकाचा स्वत:वर गोळीबार..

ड्यूटीवर असलेल्या पोलिस निरीक्षकाकडून पोलिस ठाण्यातच आयुष्याची अखेर

नाशिक पोलिस दलात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अंबड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेत पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अशोक नजन (वय ४०) या पोलिस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यातच स्वतःच्या केबिनमध्ये आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या पिस्तूलमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली आहे .मात्र त्यांनी ही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले असून त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू असून काल बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्याने अचानक आत्महत्या केल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस ठाण्यातच पोलिस अधिकाऱ्याने बंदुकी मधून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

पोलिस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिस ठाण्याच्या परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. ऑन ड्युटी पोलिस ठाण्यात आत्महत्या केल्याने अचंबिले जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे