आपल खान्देश

Jalgaon Accident | भरधाव डंपरनं 9 वर्षाच्या मुलाला चिरडलं, संतप्त नागरिकांनी पेटवला डंपर

जळगाव न्यूज –

जळगाव शहरातील कालिकामाता चौकात भरधाव डंपरनं धडक दिल्यानं नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तर बालकासोबतचे दोघेही जखमी झाले असता उपस्थिती नागरिकांनी उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला होता. त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवजड वाहतुकीमुळं होणारे अपघात पाहता नुकतीच नियमावली जारी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अपघातांचं सत्र थांबलेलं नाही. शहरातील कालिकामाता चौकात भरधाव डंपरनं धडक दिल्यानं नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तर बालकासोबतचे दोघेही जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली आहे. बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी: जेवणाचं पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका ९ वर्षीय भाच्याचा मृत्यू झाला आहे. सोबत असलेली त्याची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले असून थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान या घटनेमुळं शहरातील संतप्त नागरिकांनी उभा डंपर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. योजस धीरज बहाटे (9, रा.लीला पार्क, अयोध्या नगर) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे