आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

तालुका स्थरीय विज्ञानप्रदर्शनात जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थीचे कौतुक!

  • पाचोरा – झूम मराठी ऑनलाईन

पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाचोरा शहरातील जय किरणप्रभाजी न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनीं सादर केलेल्या प्रदर्शनास आमदार किशोर पाटील यांनी केले कौतुक आधुनिक काळानुरूप पर्यावरण पुरक शाश्वत शेती, कमी खर्चात मिनी ट्रॅक्टर उपयोगात आणले, तसेच जलनिर्मिती विषयक प्रतिकृती (मॉडेल) साकारले होते.

बदलत्या शिक्षण पद्धतीचा विचार करून विद्यार्थ्यांचा व शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी शासन सतत प्रयत्न करत असते त्या अनुषंगाने जिल्ह्यात तालुका  स्थरीय विज्ञान प्रदर्शनात भरत असते, या वर्षी पाचोरा तालुक्यातील आप्पासाहेब पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा तालुका पाचोरा येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या विज्ञान प्रदर्शनात जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल वर्ग 6 वी 7 वी 8 वी व 9 वी तील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला वर्ग 6 वीतील विद्यार्थीनी पूर्वा पाटील, स्वरांगी सराफ आणि निरुशा कुमावत यांनी जलशुद्धीकरण हा प्रोजेक्ट सादर केला.

तसेच याच वर्गातील स्वानंद सराफ, जयेश पाटील, दुर्गेश पाटील, आदित्य पाटील यांनी सोलर हाऊस हा प्रोजेक्ट सादर केला वर्ग 7 वी तील विद्यार्थीनी रेवती देशमुख, लीशा जैन, प्रियांशी सोनवणे, सांची तोतला अर्पिता वावगे या विद्यार्थिनींनी सूक्ष्मदर्शक कसे काम करते तर लावण्या रावडे, मीहीका जैन, प्रांजल सुरवाडे यांनी नैसर्गिक शेती कशी करावी हा प्रोजेक्ट सादर केला तसेच वर्ग 8 वी तील विद्यार्थी दिशा पाटील, जिनिषा संघवी यांनी जलनिर्मिती हा प्रोजेक्ट सादर केला वर्ग 9 वी तील विद्यार्थी यश सुवालका, दर्शील प्रजापत यांनी मिनी ट्रॅक्टर हा प्रोजेक्ट सादर केला

या विज्ञान प्रदर्शनाला पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार  किशोरआप्पा पाटील यांनी भेट दिली व सहभागी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष गिरिषजी कुलकर्णी, सचिव जीवनजी जैन, सहसचिव संजयजी बडोला, खजिनदार जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेशजी ललवाणी तसेच सर्व संचालक मंडळ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पलता पाटील, शाळेचे सी ई ओ अतुल चित्ते या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी स्मिता देशमुख मॅडम, संगीता पाटकरी मॅडम, आनंद दायमा सर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे