आपल खान्देश
रेखा महेंद्र पाटील यांची भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पदी वर्णी
निलेश पाटील
पाचोरा (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा पदी पाचोरा च्या श्रीमती रेखा महेंद्र पाटील यांची नियुक्ती भाजपा चे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी आज केली.
श्रीमती रेखा महेंद्र पाटील हे पाचोरा शहरातील भाजपा चे सक्रिय कार्यकर्ते असून पक्षाच्या आंदोलनात व पक्ष वाढीच्या कार्यक्रमात वेळो वेळी सक्रिय सहभाग नोंदवतात. श्रीमती रेखाताईंना भाजपा कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा ना.रंजनाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा सरचिटणीस मधुभाऊ काटे, सचिन पानपाटील, प्रदेश उपाध्यक्षा उज्वला ताई बेंडाळे, जि.प.जयपाल बोदडे, जिल्हा उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन, प्रल्हाद पाटील, गणेश माळी राकेश पाटील ई.उपस्थित होते.





