राहुल बेहरे म्हणजे, वर्दीतील दर्दी माणूस
पाचोरा येथील पोलीस कर्मचारी राहुल बेहरे पाचोरा तालुक्याचे व शहराचे सर्वांचे परिचित असलेले सर्व जातीय धर्म न बघता सर्वांना धरून चालून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांनी कधीही कोणतीही लालसा न ओळखता फक्त मैत्री जपलेली असून कोणाच्याही सुखदुःखाला हजर राहून मदत सुद्धा करीत असतात रात्री बे रात्री कोणावर काही प्रसंग आला तरी वेळ न पाहता त्या व्यक्तीला भेटू त्याच्या समस्या सोडवत असतात राहुल बेहरे पोलीस कमी व मित्र जास्त त्यांनी कधीही आपल्या वर्दीचा गैरफायदा घेतला नाही तसेच गुन्हेगार असेल तर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मान ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून काम करीत असतात असेच पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्ड हे नेहमी खांद्याला खांद्या लावून काम करीत असतात प्रत्येक सणाला व काही घटना घडल्यास होमगार्ड पथक नेहमी सज्ज असते त्यात होमगार्ड महिलांचाही समावेश असतो होमगार्ड यांची ड्युटी झाल्यानंतर त्यांना आराम कक्ष व ऑफिस नसल्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनच्या आवारातच फिरावा लागत असे त्यांचीही व्यथा पाहून पोलीस कर्मचारी राहुल बेहरे यांच्यातील माणुसकी जागी झाली त्यांनी तात्काळ मानसिंगकाचे उद्योजक यांच्याशी संपर्क साधून होमगार्ड आराम कक्ष व ऑफिस साठी जागा उपलब्ध करून दिली यामुळे होमगार्ड यांना एक स्वतःच्या ऑफिस व आराम कक्ष मिळाल्यामुळे होमगार्ड वर होणारा त्रास व भटकती दूर झाली असून राहुल बेहरे यांच्या प्रयत्नाने जागा मिळाल्यामुळे होमगार्ड समादेशक चंद्रकांत महाजन, व होमगार्ड वरिष्ठ फलटणनायक ,रवींद्र पाटील यांनी त्यांचे आभार मानले तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे, पी एस आय योगेश गणगे, पीएसआय प्रकाश चव्हाण, पीएसआय परशुराम दळवी यांनीही सर्वांनी राहुल बेहरे याचे कौतुक व अभिनंदन केले.




