महाराष्ट्र

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण ; ट्विट करुन दिली माहिती

राज्यात कोरोनाचा संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री वर्षा गायकवड यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दररोज सहभागी होत आहेत. आता वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या अनेक मंत्री, आमदारांच्या संपर्कात आल्या होत्या त्यामुळे चिंता वाढली आहे.

वर्षा गायकवाड ट्विटमध्ये म्हणाल्या की, “मला आज कळलं की काल संध्याकाळी प्रथम लक्षणं जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी चाचणी सकारात्मक आली आहे. माझी लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला वेगळे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांना खबरदारी घेण्याची विनंती करते.”

राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे