पाचोरा नगरपरिषद भाजप गटनेता पदाची माळ सुरज वाघ यांच्या गळ्यात..

- दिलीप परदेशी
पाचोरा टुडे | पाचोरा नगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी सुरज संजय वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नगरसेवक सुरज वाघ हे भाजपाची बाजू भक्कमपणे मांडण्यात यशस्वी ठरतील.
पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक सुरज संजय वाघ ह्यांनी पहिल्यांदा निवडणुक लढवली आणि त्यात ते यशस्वी झाले प्रभाग क्रमांक 10 मध्ये ते जायंट किलर ठरले असून आता भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी सुरज संजय वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत.
या निवडीच्या प्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशालीताई सूर्यवंशी आणि संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षाच्या ध्येयधोरणांना पुढे नेण्यासाठी आणि नगरपालिकेत भाजपाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी सुरज वाघ यांची ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
नवनियुक्त गटनेते सुरज वाघ यांच्यासोबतच नवनिर्वाचित नगरसेवक राहुल गायकवाड, सौ. कविता विनोद पाटील, सौ. कविता उमेश हटकर, गोपाल अर्जुनदास वासवाणी आणि देशमुख आमरीन अब्दुल रहेमान यांनी या निवडीचे स्वागत केले. सर्व लोकप्रतिनिधींनी एकमताने सुरज वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे.
निवडीनंतर सुरज वाघ यांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मधुकर काटे, सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी, सचिन भोसले, भूषण वाघ, वासुदेव महाजन, विकास पाटील, शरद पाटील, विनोद पाटील, लकी पाटील, ॲड. अविनाश सुतार, सुनील पाटील सर, ए. बी. अहिरे, सतीश बापू शिंदे, टिपू देशमुख, बंटी हटकर, दीपक माने, स्वप्निल सोनार, ॲड. ललित सुतार, पिंटू चौधरी, जगदीश पाटील, निखिल डी. पाटील, बंटी महाजन, कृष्णा साळुंखे यांसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“पाचोरा शहराच्या विकासासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. पक्षाने दिलेली ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीपणे पार पाडेल,” असे मनोगत नवनियुक्त गटनेते सुरज वाघ यांनी निवडीनंतर व्यक्त केले.



