आपल खान्देश

राज्यातील महायुती सरकारचा आज शपतविधी संभाव्य मंत्र्यांची नावे समोर,

जळगावातील या आमदारांचा समावेश..


राज्यातील विधानसभा निवडणूकित महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झाला. मविआला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांना मंत्रीपद.

दरम्यान स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच कोणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडणार, याचीही राज्यात चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचा आज शपथविधी होणार आहे. हा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते या शपथविधीला हजर राहणार आहे. यावेळी कोण-कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे लक्ष लागले आहे. ज्याचे आमदार जास्त, त्याला जास्त मंत्रि‍पदे मिळतील, अशी शक्यता आहे. पाहूयात संभाव्य मंत्र्यांची नावे..

  • भाजप-

देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, रविंद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, गिरीष महाजन, अतुल भातखळकर, नितेश राणे, राहूल कूल, संजय कुटे, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे, मंदा म्हात्रे, देवयानी फरांदे

  •  शिवसेना –

एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, भरत गोगावले, संजय शिरसाट, उदय सामंत, दीपक केसकर, संजय राठोड, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार 

  • राष्ट्रवादी काँग्रेस –

अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्रम, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ,आण्णा बनसोडे 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे