ब्रेकिंग

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदी बदली

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची नुकतेच बदली झाली होती. डॉ.प्रवीण मुंढे यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नव्हती. सोमवारी राज्यातील पोलीस अधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असता त्यात डॉ.प्रवीण मुंढे यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची नुकतेच बदली करण्यात आली होती तर त्यांच्या जागी जळगाव पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची वर्णी लागली होती. जळगाव जिल्ह्याचा पदभार एम.राजकुमार यांनी पदभार स्वीकारला असला तरी डॉ.प्रवीण मुंढे यांची इतर कोणत्याही ठिकाणी पदस्थापना करण्यात आली नव्हती.

पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले डॉ.प्रवीण मुंढे यांनी काही दिवसापूर्वीच जळगाव शहर सोडले होते. राज्य शासनाने सोमवारी पोलीस अधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे जम्बो गॅझेट प्रसिद्ध केले त्यात मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी डॉ.प्रवीण मुंढे यांची पदस्थापना करण्यात आली आहे. धुळे येथील अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची नाशिक पोलीस उपायुक्त पदी बदली करण्यात आली 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे