आपल खान्देश

धुळ्यात भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची हुबेहूब प्रतिकृती

धुळे : साक्री रोड परिसरातील भीम नगर येथे १ जानेवारी शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला मान्यवरांनी मानवंदना देत अभिवादन केले आहे. माजी सैनिकांच्या वतीने विजयस्तंभाला मानवंदना देत सलामी देऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादनाच्या कार्यक्रमांस सुरुवात करण्यात आली. भीमा नदीच्या तिरावर १ जानेवारी १८१८ रोजी २८ हजार पेशवे व ५०० महार बटालियन यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धात ५०० महार बटालियन सैनिकांनी २८ हजार पेशव्यांचा पराभव केल्याने त्यांच्या स्मृतीसाठी दिवस साजरा केला जातो.

भीमा-कोरेगाव येथील हुबेहूब प्रतिकृती राष्ट्रवादी माजी नगरसेवक जितू शिरसाठ यांनी भीम नगर येथे उभारली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील असंख्य भीम सैनिक येथे मानवंदना देण्यासाठी येत असतात. कोरोना नियमांमुळे अनेक जिल्ह्यातील भीमसैनिक हे कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्याकरता जाऊ शकत नाही. पण, धुळे जिल्ह्यातच विजय स्तंभाची प्रतिकृती असल्याने अनेक भीम सैनिकांनी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली आहे. तसेच, या शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी जितू शिरसाठ, धनराज शिरसाठ यांच्यासह समाज बांधव संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे