पाचोरा शहरांमध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली..
निवडणूकीचा टक्का वाढवावा यासाठी गावोगावी जनजागृतीचे विविध उपक्रम घेऊन मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
- दिलीप जय परदेशी.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाची तारीख अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. विधानसभा मतदार संघ अंतर्गत मतदारांमध्ये मतदान विषयी जनजागृती व्हावी या करीता मॅरेथॉन इलेक्शन रन” स्पर्धेचे आयोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आली
विविध माध्यमातून सर्व घटकांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, गावोगावी जनजागृतीचे विविध उपक्रम घेऊन मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. तसेच काल पाचोरा भडगाव शहरांमध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदानकेंद्रामध्ये व त्या गावांमध्ये जेष्ठ मतदार, महिला मतदार, युवक मतदार यांच्याशी संवाद साधून, आवाहन पत्राचे वाटप करून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.
यासाठी प्रशासनाच्या वतीने भूषण अहिरे, निवडणूक निर्णय अधिकारी, 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा, विजय बनसोडे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, पाचोरा, श्रीमती शितल सोलाट, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, भडगांव, मंगेश देवेर, मुख्याधिकारी, नगर पालिका, पाचोरा विनोद कुमावत, निवासी नायब तहसिलदार, पाचोरा, तसेच तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.



