आपल खान्देश

पाचोऱ्यात शिवसेना प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा गाजवली..

विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या उमदेवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ पाचोरा येथे शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या मा.सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा पार पडली.

या सभेत त्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडत, विविध ज्वलंत मुद्द्यांवर बोलताना विरोधकांवर तीव्र टीका केली.सुषमाताई अंधारे यांनी लोकशाहीची मूल्ये, कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, रोजगाराच्या संधी तसेच मतदारसंघात वाढती गुंडागर्दी यावर सडेतोड विचार मांडले. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी या समस्यांवर कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित करत, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रत्येक शिलेदाराला निवडून देणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी ठामपणे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे