आपल खान्देश
पाचोराशहरातील पोलीस लाईनावर शोककळा; पोलीस बॉयचे दुदैवी निधन..
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील पोलीस लाईन मधील १९ वर्षीय भावी इंजीनियर चा इलेक्ट्रिक शॉक ने दुदैवी मृत्यू झाला असून गणेश मंडळासह पोलीस परीवारावर दुःखाचे सावट आले आहे.
पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांचा सारथी ए एस आय अशोक महाजन यांचा एकलुता एक मुलगा आदीत्य अशोक महाजन (१९) हा पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटर ची पिन काढायला गेला असता त्याचे इलेक्ट्रिक शॉक लागुन निधन झाले. आदीत्य हा इंजिनिअरिंग चे शिक्षण नांदेड येथे घेत होता. पोलीस लाईन मध्ये सालाबाद प्रमाणे गणेश स्थापना पोलीस बॉईज करत असतात यासाठी आदीत्य आला होता. त्याच्या दुदैवी जाण्याणे शहरात शोककळा पसरली अशोक महाजन यांना एक मुलगा एक मुलगी आहे. पोलीस परीवाराच्या दुःखात कॉंग्रेस परीवार सहभागी असल्याचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी झूम मराठीच्या प्रतिनिधीला सांगितले.



